"आई एक नाव असतं,
घरतल्या घरात गजबलेल गाव असतं !
सर्वात असते तेन्व्हा जाणवत नाही,
आता नसलि कुठेच तरिहि नाही म्हणवत नाही!
आई असते एक जागा,
वातीला उजेड दावणारा समईतीला धागा,
घर उजळत तेन्व्हा तिचा नसतो मान,
विझुन गेली अंधरात की,
सैरावैरा धावायलाहि कमी पडतं रान!
आई घरात नाही??
मग कुणाशी बोलतात गोठ्यात हम्बरनर्या गाई???
आई खरच काय असते??
लेकराची माय असते,
दुधावरची साय असते,
लंगड्याचा पाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतहि नाही आणि उरतहि नाही....!!!"
