Wednesday, 7 January 2015

माझी शाळा


माझी शाळा...!!!





हि आवडते मज मनापासूनी शाळा 
लाविते लळा ही जसा माउली बाळा ||
हासर्‍या मुलांची बाग जशी आनंदी,
ही तशीच शाळा मुले एथे स्वछन्दि ||
हासूणी हासउनि खेळूनी सांगून गोष्टी,
आम्हास आमुचे गुरुजी शिक्षण देती ||
हे प्रेम कराया किती भोवती भाउ,
हातात तयांच्या हात देऊनी राहू ||
येथेच बंधू प्रेमाचे घ्या धडे ,
अन् देशकार्य करण्या व्हा खडे,
मग लोक बोलतिल,
धन्य धन्य ती शाळा...!!
जी देशाकरीता तयार कारिते बाळा...!!

No comments:

Post a Comment